Top 5अर्थताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“वेदान्ता प्रकल्प महाराष्ट्रातून गेला म्हणे, पण आला कधी होता?”; आशिष शेलारांचा विरोधकांना सवाल

मुंबई – Vedanta-Foxconn Project : वेदान्ता-फॉक्सकॉन कडून राज्यात १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, संबंधित प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. त्यारून राज्यात शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. सरकारच्या आकार्यक्षमतेमुळेच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका केली जात आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील अशीच टीका केली होती. त्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. “वेदान्ता समूहाला ठाकरे सरकारने कोणत्या सवलती दिल्या? याबाबतचा पुरावा दाखवावा किंवा प्रकल्पाच्या भूमिपुजानांचा पुरावा दाखवावा. करारनामा झालेला नसताना, प्रकल्प गेला असा जावईशोध कुठला आहे?”असा प्रतिसवाल करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.

विधानसभा अधिवेशनात वेदान्ता प्रकल्प राज्यात होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, त्यावर प्रश्न विचारला असता आशिष शेलार म्हणाले, वेदान्ता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्वीट करत प्रकल्प उभारण्याबद्दल माहिती दिलेली होती. अजूनही प्रकल्प ते महाराष्ट्रात उभारणार आहेत. मात्र, राज्यात आलेला प्रकल्प गेला असा आदित्य ठाकरेंनी पेंग्विन जावईशोध कसा लावला?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. त्याचबरोबर आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणून दाखवणार असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये