देश - विदेश

मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी भाजप आमदाराचा राजीनामा

बीड | Maratha Reservation : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे. काही ठिकाणी मराठा आदोलनाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र पाहायला मिळत आहे. काल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी राजीमाना दिला होता. तर आज बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार (Laxman Pawar) यांनी राजीनामा दिला आहे.

भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांचा राजीनामा पाठवून दिला आहे. तर मनोज जरांगे पाटलांनी आमदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण तरी देखील लक्ष्मण पवार यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण पवार यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे की, अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्यामुळे मी मराठा आरक्षणासाठी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

दरम्यान, काल मराठा आंदोलक हेमंत पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी हेमंत पाटलांना खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यानंतर पाटलांनी कसलाही विचार न करता तात्काळ त्यांचा पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांच्या नावानं लिहून आंदोलकांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये