महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री बसलेत; संजय राऊतांच्या या टिप्पणीवर भाजपचे लांबलचक प्रत्युत्तर
मुंबई | ”मुख्यमंत्री दिल्लीवाल्यांची मन की बात ऐकायला येतात. पण, नांदेड, नागपूर, संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत मृत्यूचं तांडव सुरू आहे. त्याचा आक्रोश त्यांना ऐकायला जात नाही. दोन उपमुख्यमंत्र्यांनाही हा आक्रोश ऐकायला जात नाही. महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरत आहे. त्या रेड्यावर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत,” अशी घणाघाती टिपण्णी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये 100 पेक्षा जास्त लोक मरण पावलेत. हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मनाला अवस्थ करत नसेल तर त्यांचं मन मेलं आहे. ते दिल्लीची ‘मन की बात’ ऐकतात. पण राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुरु असलेले मृत्यूचे तांडव त्यांना ऐकायला जात नाही. शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबादर आहे. त्यांचं शेतकरी आणि सामान्य माणसाकडे राज्याकडे लक्ष नाही. ठेकेदारी, टेंडरबाजी, पालकमंत्रीपद आणि महामंडळ या सगळ्या गोष्टींमध्येच राज्य सरकार मश्गुल आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
भाजपचे प्रत्युत्तर….
यावर भाजपानं ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं, “महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत, असे संजय राऊत आज म्हणाले. राऊत, तुमच्या जिभेला हाड नाही, हे तुम्ही वरचेवर सिद्ध केलेच आहे.. पण आज तुम्हाला संवेदनाही नाहीत हेही दाखवून दिले. कधी तुमच्या मालकाला विचारा. त्यांना बीडचा सुमंत रुईकर आठवतो का? तो आठवा!! म्हणजे तुमचे आजचे वाक्य तुमच्याच कानफटात कसे वाजते त्याचा आवाज आठवा.”
https://x.com/BJP4Maharashtra/status/1710177544287482206?s=20