देश - विदेश

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, नक्की काय आहे प्रकरण!

नवी दिल्ली – Ink thrown on Rakesh Tikait Face | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचे प्रमुख राकेश टिकैत (Ink thrown on Rakesh Tikait Face) यांच्यावर आज शाईफेक झाली आहे. बेंगळुरूमधील (Bengaluru) पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला होता.

राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि युद्धवीर सिंह (Yudhvir Singh) पत्रकार परिषदेला संबोधित करत होता. एका लोकल चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर आपली भूमिका स्पष्ट करत होते. अचनाक त्यावेळी टिकैत यांच्यावर शाई फेकण्यात आली.

अचानक झालेल्या शाईफेकीमुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेतील लोकांनी एकमेकांना खुर्च्या मारल्या. पोलिसही यावेळी उपस्थित होते मात्र त्यांनी त्या व्यक्तिला थांबवलं नसून ही सरकारची मिलीभगत असल्याचा आरोप आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये