कीर्तने अँड पंडित चार्टर्ड अकाउंटंट्सच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदानाला मोठा प्रतिसाद

पुणे : Blood Donation Camp Pune ७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic day 2023) आयोजित शिबिरात ७४ जणांनी रक्तदान करत राष्ट्राला अनोख्या स्वरूपात मानवंदना दिली. कीर्तने अँड पंडित चार्टर्ड अकाउंटंट्स एलएलपी (Kirtane And Pandit Accountants LLP) यांच्या वतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रक्तपेढीच्या (Dinanath Mangeshkar Hospital Pune) सहकार्याने हे शिबीर आयोजिले होते. ‘कीर्तने अँड पंडित’मधील कर्मचारी, तसेच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करत देशाप्रती प्रेम व्यक्त केले. रक्तदात्यांना रक्तपेढीकडून प्रमाणपत्र देण्यात आले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय, ICAI) केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, आयसीएआय पुणे शाखेचे उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, सदस्य सीए अमृता कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. आयसीएआयच्या विभागीय समितीच्या सदस्या सीए ऋता चितळे, सीए शशांक पत्की, ‘कीर्तने अँड पंडित’चे सीए मिलिंद लिमये, सीए सुहास देशपांडे, सीए शरद भागवत, सीए पराग पानसरे, अनुजा देवधर-कुलकर्णी, नताशा नाखरे, शिवानी इंगवले, प्रणव सोनी व प्रज्योत परब आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सीए मिलिंद लिमये म्हणाले, “प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजिले होते. आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या उपक्रमांना चांगला पाठिंबा दिला आहे. यापूर्वीही स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वज संकलन अभियान राबविले होते. सामाजिक भावनेतून कार्य करताना कायमच आनंद मिळतो.” सीए चंद्रशेखर चितळे यांनीही रक्तदात्यांना शुभेच्छा देत रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.