टांगती तलवार
संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर तुरुंगवासाची तलवार लटकत आहे. ही तलवार केवळ त्यांच्यावरच नाही तर संजय राऊत यांच्यावरही लटकलेली आहे. किरीट सोमय्या यांनी जी प्रकरणे काढली ती तपासी यंत्रणांना परब आदी मंडळींनी जमा केलेल्या कागदपत्रांवरून आता त्यांच्या चारित्र्याचा पंचनामा केला तरी पाटनकरांसारख्या मंडळींनी जे काही केले त्याचा तपास संपणार नाही.
जंबो कोविड सेंटर घोटाळ्यात आता एक-एक मोहरा जाळ्यात सापडला जात आहे. याचे धागेदोरे अखेर मातोश्रीपर्यंत पोहोचवायची इच्छा राज्यकर्त्यांची आहे, असे मत आरोपी व्यक्त करणार यात शंका नाही. मात्र हे कितपत सत्य आहे याचा विचारही करणे आवश्यक आहे. कोविड ही महामारी जगाचा थरकाप उडवणारी होती. मानवता, संवेदनशीलता, सेवा हा भाव कोविड सेंटरमध्ये असायला पाहिजे हे अलिखित नियमावर व्रत म्हणून होते. मात्र यात पैसे मिळवणे आणि स्वतःचा खिसा भरवून घेणे हा विषय काही जणांनी केला.
आता उघड कोणी तसे म्हणणार नाही, मात्र बाहेर आलेली माहिती फारशी बरी नाही. यात बीएमसीच्या जंबो कोविड-१९ केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड सेंटरचे कंत्राट घेतलेल्या लाइफलाइन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते, असे ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. बीएमसीच्या जंबो कोविड-१९ केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप ईडीने केला आहे.
एकीकडे कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे आता एसआयटीदेखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना यामध्ये एसआयटी चौकशीमध्ये आणखी कोणती माहिती मिळते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनेक छापेमारी आणि चौकशीनंतर अखेर ईडीने यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर आणि डॉ. बिचुले यांना अटक केली आहे.
आता ही अटक काय दर्शवते याचा विचार केला तर भ्रष्टाचार झाला, असे सकृतदर्शनी पाहायला मिळते. आता हा भ्रष्टाचार कोणी केला, त्याला कोणाचा वरदहस्त आहे, हेपण जगजाहीर झाले आहे. खासदार संजय राऊत यांच्या मित्र परिवाराने शंभर कोटीचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजित पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपाचे तथ्य आता उघड होत आहे असे दिसत आहे.
सोमय्या यांच्यावर दोन दिवस सुरू असलेली मोहीम कमी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई केली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एका बाजूने संजय राऊत यांचेही पाटकर या महिलेबाबतचे प्रकरण काढले गेले होते. संजय राऊत यांनी वापरलेली भाषा असभ्यतेच्या पलीकडे होती. त्यामुळे संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात फरक काय, असाही मुद्दा कदाचित उपस्थित होतो. अर्थात या दोघांचे हेतू वेगवेगळे होते. तसेच पाटकर यांनी राऊत यांच्या विरोधात तक्रार केली होती.
त्यापुढचा फरक म्हणजे, सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात घडवलेल्या प्रकरणाचे सूत्रधार अनिल परब यांच्या तपास यंत्रणांच्या कागदपत्रांवरून आरोप केले होते. पैसे, संपत्ती अवैध मार्गाने जमा केल्याचे आरोप केले होते. वैयक्तिक चारित्र्यहनन केलेले नव्हते. मात्र तरी सोमय्या यांची ती बाब नैतिकतेच्या मुद्द्यावर कधीच समर्थन करणारी नाही. होणारी नाही. मात्र संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची वरात लवकरच तुरुंगात जाणार आणि खितपत पडणार हे सत्य आहे.