अनन्या पांडेला बिना मेकअप, विदाऊट फिल्टर तेही बोल्ड लूकमध्ये बघितलंत का? फोटोस व्हायरल

Entertainment News : (Ananya Panday Viral Photos) अभिनेते, अभिनेत्री, कलाकार यांचे लाखो लोक फॅन असतात. (Bollywood Celebrities) त्यांच्या सोशल मीडिया अकाऊन्टला ते हमखास फॉलो करतात. असे प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री हे बिना मेकअप क्वचितच दिसतात. त्यांच्या सोशल मीडियावर देखील एडीट केलेलेच फोटो सहसा बघायला मिळतात. (Bollywood Actress Viral Photos) मात्र, बऱ्याचदा अशा अभिनेते अभिनेत्रींना बिना मेकअप, विदाऊट फिल्टर बघून चाहत्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास देखील बसत नाही. अशातच आता देशभरात प्रसिद्ध असलेली बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday Viral Bold Photos) स्वतःचे विदाऊट मेकअप मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ती खूपच ट्रेंड मध्ये आलेली आहे. (Ananya Panday Trending)
अनन्या पांडेला तिच्या जबरदस्त अक्टिंगमुळे लाखो लोक ओळखतात आणि तिचे फॅन आहेत. अनेकदा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे (Ananya Panday Bold Photoshoot) चर्चेत असते. कधी बीच वरून थेट फोटो शेअर करणं असो की कधी बिकिनी शूट असो ती आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

अनन्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या :
अनन्याचे नुकतेच ‘लायगर’ आणि ‘गहेराईयां’ चित्रपट येऊन गेले आहेत. त्याधीही तिने ‘पती पत्नी और ओ’, स्टुडंट ऑफ द एअर’ सारख्या चित्रपटांत दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले आहे. हे झालं तिच्या चित्रपट संबंधित जीवनाबद्दल.

तिच्या फमिलीबद्दल सांगायचं झालं तर, 90’s मधील चुंकी पांडे सगळ्यांचे आवडते कलाकार हे अनन्याचे वडील आहेत. चिक्की पांडे देखील तिचे रिलेटिव्हस लागतात. अनन्या केवळ २४ वर्षाची आहे. २०१९ पासून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे.

करिअर सुरु होताच अनन्याने समाजभान जपत समाजाच्या विकासाभिमुक एक संस्था देखील सुरु केलेली आहे. ‘सो पॉसिटीव्ह’ नावाच्या संस्थेत लोकांना सायबर बुलिंग, सायबर अटॅकसंबंधित जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो.

सध्या अनन्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ती तिने आज शेअर केलेल्या फोटोंमुळे. आज तिने गॅलरीत शॅडो फोटोशूट केला आहे. ज्यात कसलेही फिल्टर किंवा मेकअप केलेले दिसत नाही. त्या पोस्टला तिने कॅप्शन देखील तसेच दिले आहे. ‘everything is just better on film 🎞️’ म्हणजे ‘प्रत्येक गोष्ट फक्त चित्रपटातच सुदर दिसते.’ असं कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिलेले आहे. मात्र, अनन्या बिना मेकअप देखील सुंदर दिसत असल्याने चाहत्यांनी लाईक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रेम दाखवलं आहे.

इन्स्टाग्रामवर अनन्याचे तब्बल २४ मिलियन फॉलोवर्स आहेत.