मुंबई | 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांना पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे मंत्रीपद मिळाले होते. या काळात त्यांनी आपला कारभार उत्तम रितीने सांभाळला होता. मात्र आता महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्यामुळे कोसळले. तसंच आदित्य ठाकरे यांच्या क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींशी ओळखी आहेत. याच दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एका बॅालिवूड अभिनेत्री कमेंट केली असून सध्या तो चर्चेचा विषय ठरत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या जिद्दीला सलाम करणारा एक भावनिक मेसेज आदित्य यांनी इन्स्टाग्राम पोस्टमार्फत लिहिला. “नेहमी योग्य माणसांचा आदर्श घेणं महत्त्वाचे असते. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचा ऋणी आहे. तुमचे प्रेम हीच खरी आमची ताकद आहे”. असं कॅप्शन देत आदित्य यांनी पोस्ट शेअर केली आहे. आदित्य यांच्या या पोस्टवर बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहना कुमरा हिने कमेंट केली आहे. आहना हिने पोस्टमध्ये काही न लिहिता, केवळ बदामाचे चिन्ह काढले आहेत. तिने एक दोन नव्हे तर तब्बल 5 हार्ट्स कमेंटसमध्ये लिहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
आहना कुमारा ही एक प्रसिद्ध बॅालिवूड अभिनेत्री आहे. तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘युद्ध’ आणि अभिनेता शरद केळकर याच्याबरोबर ‘एजंट राघव- क्राईम ब्रँच’ या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तसंच ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘द अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केलं आहे.