“त्यांना माझ्या स्तनांचा आकारही…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा!

मुंबई | Bollywood Actress – आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी बाॅलिवूडबाबत (Bollywood) धक्कादायक खुलासे केले आहेत. या दरम्यान आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं देखील तिला बाॅलिवूडमध्ये आलेला अनुभव सांगितला आहे. ‘साथीया’, ‘पेज 3’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स’सारख्या चित्रपटातून संध्या मृदुल (Sandhya Mridul) ही प्रसिद्ध अभिनेत्री समोर आली आणि अवघ्या काही दिवसातच तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तसंच गेली काही वर्ष ती मनोरंजनसृष्टीपासून लांब आहे. त्याचनिमित्ताने हिंदुस्तान टाईम्सच्या पत्रकाराने संध्याशी तिच्या फिल्मी करकीर्दीविषयी गप्पा मारल्या. या एक्सक्लूझीव्ह मुलाखतीमध्ये संध्याने बॉलिवूडमध्ये काम करताना तिला आलेले अनुभव सांगितले आहेत.
“पेज 3 आणि रागिणी एमएमएसच्या वेळी माझे स्तन मोठे नव्हते. त्यामुळे मला दोन्ही वेळेस त्यासाठी ब्रेस्ट पॅड वापरायचा सल्ला दिला होता. रागिणी एमएमएस मधील पात्राची ती गरज होती त्यामुळे मला ते करणं भाग होतं. पण आजही मला माझ्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी सल्ला दिला जातो. लोकांना माझी त्या भूमिकेसाठी गरज असते पण त्यांना माझ्या स्तनांचा आकारही मोठा हवा आहे. उद्या कुणी येऊन मला माझ्या नाकाचं ऑपरेशन करायला सांगेल, त्यामुळे मला हे आवडत नाही. दुसऱ्यासाठी मी माझ्या शरीरात बदल करणार नाही. म्हणूनच मी जास्त इथे रमत नाही. मी फक्त पैसे कमावण्यासाठी कधीच या चित्रपटसृष्टीत आले नव्हते, माझ्यावर बरीच आर्थिक संकटं आली तेव्हादेखील मी तो मार्ग निवडला नाही”, असं संध्यानं सांगितलं.
पुढे संध्या म्हणाली, “यशजी यांनी जेव्हा मला साथीयामधील भूमिका दिली तेव्हा मी तातडीने ती नाकारली होती. तेव्हा मला कमर्शियल चित्रपटात फारसा रस नव्हता. यशजी म्हणाले की ही भूमिका तू केलीच पाहिजेस आणि त्यांनी मला दिग्दर्शक शाद अलीला भेटण्यास सांगितलं. त्यानंतर मी जास्त विचार न करता तो चित्रपट केला आणि मला तो करताना खूप मजा आली शिकायलाही मिळालं.”
One Comment