ताज्या बातम्यादेश - विदेश
दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी

एअर इंडियाच्या विमानात (Air India News ) बॉम्ब ठेवल्याच्या वृत्तामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे विमान कॅनडातील इक्लुइट विमानतळाकडे वळवण्यात आल्याचे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या धमकीनंतर दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे विमान कॅनडातील इकालुइट विमानतळाकडे वळवण्यात आले. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी, दिल्ली ते शिकागो हे फ्लाइट एआय १२७ सुरक्षा धोक्यानंतर कॅनडातील इक्लुइट विमानतळावर उतरवण्यात आले.
“विमान आणि प्रवाशांची विहित सुरक्षा प्रोटोकॉलनुसार पुन्हा तपासणी केली जात आहे. प्रवाशांना त्यांचा प्रवास सुरू होईपर्यंत मदत करण्यासाठी एअर इंडियाने एजन्सी सक्रिय केल्या आहेत,” असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.