Top 5क्राईमताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंना काही अटींवर अटकेपासून सुरक्षा

मुंबई : भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात सीबीआयच्या (CBI) घेऱ्यात असलेले भारतीय महसूल सेवा समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ८ जून पर्यंत त्यांना कोर्टाकडून अटकेपासून सुरक्षा देण्यात आली आहे. याधीच्या सुनावणीत समीर वानखेडे यांना २२ में पर्यंत अटकेपासून सुरक्षा देण्यात आली होती. ती तारीख आज संपली असल्याने आजच्या सुनावणीत पुन्हा त्यांचे ८ जून पर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण वाढवण्यात आले आहे. (Bombay HC extends interim relief to Sameer Wankhede till June 8 in Aryan Khan bribery case)

या अटींवर वानखेडेंना अटकेपासून सुरक्षा

  • समीर वानखेडे यांच्या अटकेपासून सुरक्षेची तारीख वाढवली असली तरी त्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत.
  • समीर वानखेडे यांनी संबंधित प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करु नये.
  • सीबीआयच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही.
  • प्रसारमाध्यमांशी बोलणार नाही.
  • सीबीआय अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहीन.

अशा अटी मान्य असल्याची लेखी हमी देण्याचे आदेश न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर समीर वनाखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने छापा मारला होता. या कारवाईत अभिनेत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र, वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये