जामीन मिळूनही अनिल देशमुख कोठडीतच; सीबीआयने ‘या’ कारणामुळे १० दिवस थांबवलं!

मुंबई : (Bombay High Court granted bail to Anil Deshmukh) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अनिल देशमुख यांना सोमवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र काही कारणामुळे अनिल देशमुख कोठडीतच राहणार आहेत. सीबीआयच्या मागणीमुळे अजून १० दिवस तरी अनिल देशमुखांची सुटका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे येत्या काळात देशमुख यांना वर्षाभरानंतर तरी सुटका होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन दिल्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान दिलं आहे. सीबीआय आता या विषयी पुढे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आता १० दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. जामीनाचा आदेश स्थगित करावा, अशी मागणी सीबीआयने केल्याची माहिती देशमुखांचे वकील अनिकेत कदम यांनी माध्यमांना सांगताना दिली आहे.
न्यायालयाने देशमुखांना १ लाख रुपयांच्या बॉन्डसह जामीन दिला आहे. अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी सीबीआय आणि त्यानंतर ईडीच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर 100 कोटीच्या खंडणीचा आरोप केला होता. मागील महिन्यांत उच्च न्यायालयाने त्यांना ईडीच्या गुन्ह्यातून जामीन दिला आणि आता सीबीआयच्या गुन्हातून त्यांची सुटका होणार आहे.