इतरक्राईमताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स
पुण्यात रात्रीचा थरार; सराफा व्यावसायिकावर गोळीबार, दागिन्यांची बॅग पळवली
पुणे | Pune News : पुण्यातील (Pune) वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बी.टी. कवडे रोडवर सोने व्यापाऱ्यावर गोळीबार झाल्याची खळबजनक घटना रात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.
दिवाळीचे दिवस असल्याने लोकांची सोने-चांदी खरेदी करण्याची लगबग पाहायला मिळत आहे. त्यातच सोने-चांदी घरी घेऊन जात असताना एका सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली.
सराफाकडील दागिने हिसकवण्याचा दोन चोरट्यांनी प्रयत्न केला. रात्री १० वाजताच्या सुमाराची ही घटना आहे. प्रदीप मदनलाल ओसवाल (वय ३५) असे सराफाचे नाव असून ते मुंढव्याचे रहिवाशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पायावर दोन आणि तोंडावर एक गोळी लागली आहे.