सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे. रमेश बैस यांच्या जागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे.
झारखंडमध्ये सी. पी. राधाकृष्णन यांच्या जागी भाजपाचे वरिष्ठ नेते संतोष कुमार गंगवार यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री अनेक राज्यांमधील राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन?
राधाकृष्णन हे अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांनी तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं.पण ते , पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजीत राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे राज्यपालपद सोपवण्यात आले आहे.