मनोरंजनमहाराष्ट्र

मुंबई बाँबस्फोटानंतर कुणी किती पैसे घेतले, ते सांगू का?

राणेंच्या प्रश्नांनी सरकार अवाक्
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे खोटेपणाचा कळस असल्याचे सांगून राणे या मुलाखतीत म्हणाले की, विद्यमान मुख्यमंत्री राज्याच्या विकासाच्या कोणत्याही प्रश्नावर बोलत नाहीत. मूलभूत आणि पायाभूत सोई-सुविधा गेल्या अडीच वर्षांत किती निर्माण केल्या, याविषयी ते मूग गिळून बसतात, तसेच एसटी कर्मचारी संप इंधनावरील जीएसटी कमी करणे, किंवा महागाईवर नियंत्रण आणणे याबाबत उद्धव ठाकरे काहीही माहिती देत नाहीत, हे अनेकदा दिसून आले आहे, असे राणे म्हणाले.

मुंबई : शिवसेनेने सुरू केलेले शिवसंपर्क अभियान म्हणजे खरे तर शिव्यासंपर्क अभियान असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांबाबत बोलू नये, अशी सूचना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेत केलेल्या विविध आरोपांना राणे यांनी एका पत्रकार परिषदेत सविस्तर उत्तरे दिली. त्यावेळी ते बोलत होते.

राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मांडीला मांडी लावून बसलेले नवाबभाई चालतात, पण स्वत:चा भाऊ चालत नाही; त्याची ते ‘मुन्नाभाई’ अशी संभावना करतात. त्यांना नवाबभाई चालतात, कारण त्यांचा दाऊदशी संबंध आहे. वर्ष १९९१ पासून आम्हाला जे संरक्षण आहे, ही बाळासाहेबांची कृपा आहे. दाऊदचा संबंध भाजपसोबत जोडायचा. आमचा काय संबंध दाऊदशी? केंद्र सरकारने सगळ्या कारवाया केल्या आहेत, असे नारायण राणे म्हणाले.

वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर कुणी कसे पैसे घेतले हे पाहिलं आहे. नवाब मलिक यांना दाऊदशी संबंध दिसत असताना मंत्रिपदावरून काढलं नाही, असा आरोप राणे यांनी केला आहे. २५ वर्षांपेक्षा जास्त काळ युती केली आणि मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी केलीत, असा आरोप नारायण राणे यांनी केला. अडीच वर्षांत तुम्ही काय काम केले नाही. मंत्रालयात जायचे नाही, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण, असे काम सुरू असल्याचा आरोप राणे यांनी केला.

आता पुळचट शिवसैनिक असल्याचा आरोप राणे यांनी केला. शिवाजीमहाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहूमहाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र उभा राहिला. तुम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही, असे नारायण राणे म्हणाले.
संजय राऊत यांची संगत उद्धव ठाकरे यांना भोवल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. ईडीची चौकशी झाली तर ती सुडानं करत असल्याचा आरोप केला जातो.

तुम्ही लोकांच्या घरांवर कारवाया करता ते कसल्या भावनेनं करता, असा सवाल राणे यांनी केला. नारायण राणे यांनी यावेळी यशवंत जाधव यांचा दाखला दिला. वीस हजार रुपये कमवायची क्षमता नसलेल्या माणसाकडे १५० कोटींची माया कशी जमते, असे विचारून राणे म्हणाले की, असे असेल तर मग ‘मातोश्री’वर त्यातले किती रुपये गेले असतील, याचा विचार कोणी करायचा?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये