‘बिग बॉस ओटीटी’ विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल; रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
मुंबई | Elvish Yadav : ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एल्विश यादव आता गोत्यात आला आहे. कारण नोएडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच एल्विशवर रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
सेक्टर 49 मध्ये नोएडा पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी पाच कोब्रा साप जप्त केले असून त्यांना सापांचे विष देखील तेथे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान बिग बॉस फेम एल्विश यादवचं नाव देखील समोर आलं आहे.
या प्रकरणात एल्विशचं नाव समोर आल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत नोएडा पोलिसांकडे एका एनजीओनं स्टिंग ऑपरेशन करत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा एनसीआरच्या फार्महाऊसवर एल्विश यादव काही लोकांना भेटून जिवंत सापांसोबत आणि सापाच्या विषासोबत व्हिडीओ शूट करत असल्याची माहिती मिळाली. तसंच तेथे रेव्ह पार्टी देखील आयोजित करण्यात आल्याचंही समजतंय.