ताज्या बातम्याशिक्षण

CBSE 12 वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी

मुंबई | CBSE 12th Result 2022 – आज (शुक्रवार) सीबीएसई (CBSE) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसईने (CBSE) आज, 22 जुलै 2022 रोजी बारावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

सीबीएसईने यावेळी कोरोमुळे दोन टर्ममध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या होत्या. टर्म 1च्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये आणि टर्म 2च्या परीक्षा एप्रिल ते जून 2022 मध्ये घेण्यात आल्या. दरम्यान, सीबीएसई टर्म 1चा निकाल आधीच शाळांना पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींनी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावी बोर्डाच्या परीक्षेत 94.54 टक्के मुली आणि 91.25 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये