थॉमस कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्याने भारतीय संघाला केंद्राकडून १ कोटीचं बक्षीस

नवी दिल्ली : थॉमस कप २०२२ मध्ये भारतीय बॅडमिंटन संघाने १४ वेळा विजय मिळवलेल्या इंडोनेशियाला चीत करत विजय मिळवून इतिहास रचला आहे. ७० वर्षांत भारतीय संघ यापूर्वी कधीही फायनल पर्यंत पोहोचलेला नव्हता मात्र हा इतिहास यावर्षी भारतीय संघाने तो इतिहास खोडून टाकला आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्वांकडून संघाचे कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर आता केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी संघाला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
सलग तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करून थॉमस कप 2022 चे विजेतेपद मिळवले आहे. पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने एंथनी सिनिसुकाचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. दुस-या सामन्यात सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसरा सामना एकेरीचा होता, त्यात किदांबी श्रीकांत याने जोनाथन क्रिस्टीचा 21-15, 23-21 असा पराभव केला.