ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवलं; ‘या’ नेत्याकडे सोपवली जाबाबदारी

नवी दिल्ली | Kiren Rijiju – नुकताच केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं मंत्रिमंडळ रचनेत मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवण्यात आलं आहे. आता किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कायदामंत्री पदावर किरेन रिजिजू यांच्या जागेवर आता भाजप नेते अर्जून राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये रवीशंकर प्रसाद यांच्या जागेवर किरेन रिजिजू यांची केद्रीय कायदामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.