ICC चा ‘तो’ निर्णय अन् इंग्लंड फक्त वर्ल्ड कपच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर?
Champions Trophy 2025 : भारतात खेळला जात असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये इंग्लंड संघ आता पाच सामने हरला आहे. संघाने 6 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. चॅम्पियन इंग्लंड 2 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. आणि त्यामुळे 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होण्यावर इंग्लंड संघावर मोठा धोका आला आहे.
खरे तर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतात खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड कपमध्ये फक्त 8 संघ पात्र होणार आहे. आयसीसीने 2021 मध्येच हे पुष्टी केली होती की, वर्ल्ड कप 2023 च्या लीग स्टेजनंतर पॉइंट टेबलमधील टॉप 7 संघांना पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळेल. पाकिस्तान संघाला यजमान म्हणून संधी मिळणार आहे. अशा स्थितीत गुणतालिकेसाठीची लढत रंजक असणार आहे.
इंग्लंडसाठी ही चिंतेची बाब आहे कारण वर्ल्ड कप 2023 च्या गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीची तिकिटे मिळणार नाहीत. उरलेल्या तीन सामन्यांपैकी एकही संघ हरला तर संघ अडचणीत येईल. उर्वरित तीन सामने चांगल्या फरकाने जिंकण्यात संघ यशस्वी ठरला, तर तो टॉप 7 मध्ये आपली मोहीम पूर्ण करू शकतो. 8व्या स्थानावर राहूनही संघ पात्र ठरू शकतो.
पाकिस्तान संघाला यजमान म्हणून संधी मिळाली आहे. अशा परिस्थितीत, सध्याच्या 10 संघांपैकी एकही संघ 9व्या आणि 10व्या स्थानावर राहू इच्छित नाही. नेदरलँड्स सारख्या संघाने देखील दोन सामने जिंकले आहेत आणि सध्या गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. नेदरलँड्सनेही आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले असून संघाचे अजून तीन सामने बाकी आहेत.