सिटी अपडेट्स

पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघाला विजेतेपद

अहमदनगर शहरला उपविजेतेपद

पुणे : महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने व अमरावती सॉफ्टबॉलच्यावतीने नुकत्याच झालेल्या पुरुष गटाच्या २७ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धत पुणे जिल्हा संघाने अंतिम सामन्यात अहमदनगर शहर संघाचा ३-० होमरनने पराभव करून विजेतेपद जिंकले. अहमदनगर शहर संघ द्वितीय स्थानी राहिला, तसेच तृतीय पारितोषिक अमरावती व जळगाव संघ यांना संयुक्तरीत्या देण्यात आले.

अमरावती येथिल विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात आंतरराष्ट्रीय पिचर स्वप्निल गदादेच्या वेगवान पिचिंगच्या जोरावर पुणे जिल्हा संघाने अहमदनगर शहर संघाला ३-० होमरनने पराभूत करून विजेतेपद जिंकले. या सामन्यात ऋत्वीत फाटे, अक्षय मोगल यांनी प्रत्येकी एक होमरन मारला.

यासह शुभम काटकर, गौरव राजपुरे यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची खेळी केली. अहमदनगर शहर संघाकडून पवन गुंजाळ व अभिषेक सोनावणे हे चांगले खेळले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत पुणे जिल्हा संघाने अमरावती संघाचा १४-० होमरनने धुव्वा उडविला. यावेळी पुणे जिल्हा संघाचा पिचर स्वप्निल गदादे याने अमरावती संघाचे ९ खेळाडू बाद केले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अमरावती सॉफ्टबॉल असोसिएशनचे सचिव डॉ. सुराजसिंह येवतीकर
उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये