Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशीत गारपिटीची शक्यता; कामगारांना बाहेर काढण्यात येणार अडचणी
उत्तरकाशी | Uttarkashi Tunnel Rescue : 12 नोव्हेंबरपासून उत्तराखंडच्या (Uttarakhand) सिलक्यारा-दांदलगाव बोगद्यात (Silkyara tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, पुढील 24 तासांत उत्तराखंडमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामानातील बदलामुळे बचाव कार्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
येथे, बचाव पथकाने सोमवारी पहाटे 3 वाजता सिलक्यारा बाजूने अडकलेल्या ऑगर मशीनचे 13.9 मीटर लांब भाग बाहेर काढले. उत्तराखंड सरकारचे सचिव डॉ. नीरज खैरवाल यांनी सांगितले की, पाईपमध्ये अडकलेल्या ऑगर मशीनचे ब्लेड आणि शाफ्ट कापण्याचे काम पूर्ण झाले आहे.
ऑगर मशीनचे हेडही बाहेर काढण्यात आले आहे. प्रथम 1.9 मीटर पाईप कापण्यात आले. आता हाताने काम करताना पाईपही 0.9 मीटर पुढे ढकलण्यात आले आहेत.