पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत चंद्रकांत दादांचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, “मोठ्या कामासाठी…”
पालकमंत्री पद देणं ही एका मोठ्या कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
पुणे | Chandrakant Patil – अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्याचे (Pune) पालकमंत्री झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांची (Chandrakant Patil) उचलबांगडी केली असल्याचं म्हटलं जातं होतं. त्यावेळी चंद्रकांत दादांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तर आता पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्वत: भाष्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
पालकमंत्री पदावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्याचे पालकमंत्रीपद माझ्याकडून गेल्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. पण कोणीही नाराज व्हायचं कारण नाही. कारण पालकमंत्री पद देणं ही एका मोठ्या कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत दादांनी नेमक्या कोणत्या मोठ्या कामासाठी तडजोड केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जातं होतं. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटलांकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी न देता अजित पवारांकडे देण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का बसला असून त्यांची उचलबांगडी केल्याचं म्हटलं जात होतं.