पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘सूर्यभूषण पुरस्कार’

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या योग्य निवड व उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात त्यांच्याकडून केल्या गेलेल्या कामगिरीबद्दल सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने त्यांना ‘राष्ट्रीय सूर्यभूषण पुरस्कार-२०२२’ प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सूर्यदत्तचा स्कार्फ, सम्मानपत्र व भारताचा नकाशा असलेले मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते पाटील यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’च्या सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितालिया व प्रशांत गोलेचा उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान आहे. तसेच निश्चितपणे येणाऱ्या काळात संस्थेस सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला आवडेल. सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्याचे काम ‘सूर्यदत्त’ने यापुढेही असेच करत राहावे, असे ‌मत चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केले.

Dnyaneshwar: