ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘शिका आणि कमवा ‘ योजनेचा शुभारंभ

पुणे : (Chandrakant Patil Learn And Earn Shceme) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘शिका आणि कमवा ‘ योजनेचा शुभारंभ उद्योगक्षेत्रानी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केलं आहे. ‘शिका व कमवा’ ही योजना खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (National Education Policy) अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने राज्य शासनाचे पहिले पाऊल आहे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

यावेळी पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील काळातील शैक्षणिक दृष्टिकोन हा अनुभवातून शिक्षण (Experiential Learning) या स्वरूपाचा असून ‘शिका व कमवा’ योजनेतील विद्यार्थ्यांना कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाद्वारे डिप्लोमा व ॲडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यात येणार आहे.या योजनेला कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव देण्याचा मानस आहे.यशस्वी संस्थेने या योजनेचे आदर्श मॉडेल तयार करावे व उद्योगांनी ही योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा,असं आवाहन त्यांनी केले.

Chandrakant Patil 6 1

हॉटेल जेडब्ल्यु मेरिएट येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लि. तर्फे आयोजित ‘शिका आणि कमवा’ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार राजेश टोपे, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, प्रतापराव पवार, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे, टाटा मोटर्सचे व्यवस्थापन सल्लागार गजेंद्र चंडेल आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण आणि कौशल्य शिक्षणावर भर हा या धोरणाचा गाभा आहे. मातृभाषेतून शिक्षण हा त्यातील तेवढाच महत्वाचा भाग आहे. विषयाची समज येण्यासाठी आणि संशोधनाच्यादृष्टीनेही मातृभाषेतील शिक्षणाला महत्व आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये