पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन चंद्रकांत दादांचं कभी खुशी कभी गम! ए दर्द कब होगा कम..
पुणे : (Chandrakant Patil On Ajit Pawar) पुण्याचं पालकमंत्रिपद गेल्यानंतर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे कधी खदखद व्यक्त करतात, तर कधी आपण नाराज नसल्याचं बोलतात. त्यामुळे दादांची स्थिती सध्या ‘कभी खुशी कभी गम, ए दर्द कब होगा कम’, अशीच झालीय. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मला पालकमंत्री म्हणून अतिशय जवळचे दोन जिल्हे देण्यात आले, काही नवीन आलं की माझ्या डोक्यावर टाकलं जातं असं वक्तव्य त्यांनी केलं.
पालकमंत्रिपदावरून बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला पालकमंत्री म्हणून अत्यंत जवळचे दोन जिल्हे देण्यात आले आहेत. सोलापूर इथून दहा किलोमीटर, तिथून अमरावती पाच किलोमीटर, पुणे तिथून अर्धा किलोमीटर आणि कॅबिनेटच्या बैठकीला मुंबईत येण्यासाठी शून्य किलोमीटर. असं काही माझ्याबद्दल गेल्या 40-45 वर्षांमध्ये केलंय. काही नवीन आलं की माझ्या डोक्यावर टाकलं जातंय.
काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटलांकडे असलेले पुण्याचं पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं होतं आणि ते राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे देण्यात आलं होतं. अजित पवार जेव्हापासून सत्तेत सामील झाले होते तेव्हापासून त्यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आलं.