ताज्या बातम्यापुणे

मराठा आरक्षण देण्याबाबत चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

Chandrakant Patil On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असले तरी नेमके टिकणारे आरक्षण कधी मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सूचक विधान केले आहे. तीन टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी दिवाळी पहाट निमित्त फराळासाठी ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील हे काम पाहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे हे काम सुरू केलेलं आहे. लवकरच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल, असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले, “राज्यात तीन कोटी लोकसंख्या असलेला मराठा समाज आणि साडे तीन कोटी लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे. अशा सात कोटी समाजाच्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्हीही आणि ओबीसी नेत्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या संत महतांनी जी सामाजिक वीण गुंफली आहे, ती तोडणं किंवा जोडणं आपलं काम नाही. त्यामुळे तीन टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये