इतिहास घडणार! चंद्रावर तिरंगा फडकणार…

भारत चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज
भारताच्या ‘चांद्रयान-३’ मोहिमेकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. आज दि. २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून भारत जगाला आपली ताकद दाखवणार आहे. विशेष म्हणजे भारतासह अमेरिका, चीन आणि युरोपसारखे देशही या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करीत आहेत. चांद्रयान-३ च्या यशासाठी भारताची धाकधूक वाढली आहे.
श्रीहरिकोटा | Chandrayaan 3 – भारताची महत्त्वकांक्षी मोहिम चांद्रयान – ३ (Chandrayaan 3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. आज (बुधवार) संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग होणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात येत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा बाजू ही अत्यंत खडतर आहे. इथे अनेक खड्डे आहेत. त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचे लँडिंग करणं हे इस्रोसाठी आव्हानात्मक असणार आहे. जर परिस्थिती अनुकूल नसेल तर हे लँडिंग २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. परंतु २३ ऑगस्ट रोजी लँडिंगसाठी कोणतीही समस्या येणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
चांद्रयान-3’च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण…
घरबसल्या सर्वांना हा अभिमानाचा क्षण अनुभवता येणार आहे. इस्रोकडून चांद्रयान-३ च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याचे लाइव्ह प्रक्षेपण MOX/ISTRAC कडून आज ५:२० वाजता सुरू होईल.
-शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची
-चांद्रयान-3’च्या यशासाठी जग करतेय प्रार्थना!
-साॅफ्ट लँडिंगचा प्लॅन, १.६८ किमी वेगाने खाली उतरणार.
-चंद्राचे गुरुत्वाकर्षण लॅंड होण्यासाठी गती देईल.
-चार रेट्रो फायरिंग केले जाणार.
–८०० मी. आधी दोन इंजिन बंद केले जाणार. यान चंद्राच्या जवळ येताच गती कमी होणार.