महाराष्ट्राचे सत्तासमीकरण बदलणार; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सायंकाळी शपथविधी!

मुंबई : (Devendra Fadnavis And Eknath Shinde On Swearing) बुधवार दि. २९ रोजी रात्री उशिरा ०९:00 वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि (30 जून) बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा ठाम राहिलं. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीमान्यामुळं आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटानं भाजपाशी बोलणी सुरु केली आहे. तर, दुसरीकडं महाविकास आघाडी सरकार कोसळताच भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीला एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे प्रथम भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी सात वाजता शपथ घेतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे हे थेट गोव्याहून फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. आजच भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबच शिक्कामोर्तब झाला आहे. आज राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.