‘नजर’ नाही तर ‘नजरिया’ बदला

तिच्या योनीतील ठणक मारणारी ति वेदना पार ओठीपोटातील सर्व जागा व्यापून डोळ्यातून पाणी काढते ना तेव्हा आतल्या आत तड्फड्णार हा जीव, स्वतःलाच स्वतःच्या मिठीत घेऊन कुरवाळत असतो. हलकेच पापण्यांनी तुंब झालेल्या डोळ्यांनाही , कंठातून न निघणारा दबलेला तो आवाज खुणावत असतो तू बाई आहे तुला डोळे गाळण्याचं स्वतंत्र इथं नाही …
(नीलम पवार )
दरवर्षी ‘जागतिक मासिक पाळी स्वछता दिवस'(World Menstrual Hygiene Day) हा २८ मे रोजी सर्वत्र साजरा केला जातो. पाळीच्या दिवसांतील वयक्तिक स्वच्छेतेबद्दल महिलांमध्ये जनजागृती व्हावी हा या पाठीमागचा उद्देश आहे. आजही खेडेगावांमध्ये ‘मासिक पाळी’हा शब्दही चार लोकांमध्ये मोकळेपणाने बोलला जातं नाही. मग या चार ते पाच दिवसाच्या काळात महिलांनी आपल्या शरीराच्या स्वछतेची कशी काळजी घेतली पाहिजे? कोणता आहार घेतला पाहिजे ? अशा गोष्टींची माहिती योग्य वेळी न मिळाल्यामुळे अनेक महिलांना वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक त्रासातून आणि अस्वछतेमुळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. अशाच अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला अनुभवी डॉक्टर, आहारतज्ञ आणि सोशल मीडियावरून मिळत असते.
‘जागतिक मासिक पाळी स्वछता दिवस’ सर्वात प्रथम २८ मे २०१४ मध्ये वॉश युनायटेड ऑफ जर्मनी या एनजीओने महिलांमध्ये जागृती निर्माण या उद्देशाने साजरा केला होता. आजच्या धावपळीच्या जगात महिलांना कुटुंब, नोकरी, व्यवसाय यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होत असते. आपण पाहतो की, काही महिलांना गावाकडे पाळीच्या दिवसात एका बाजूला बसवलं जातं कोणी विचारलं की,का बाजूला बसलेस तर सांगण्यात येत की, कावळा शिवला आहे. म्हणजे सांगण्याचा हेतू एकच की,आजही घरात आपण मुक्तपणे आपल्याच परिवारासोबत मासिक पाळी या विषयाबद्दल बोलू शकत नाही? तर त्याच्याचीच दुसरी बाजू लक्षात घेतली तर काही कुटुंबात महिलांच्या शारीरिक, मासिक पाली बद्दल मुक्तपणेही बोललं जात. हे ही आपल्याला पाहायला मिळत. कारण आज सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून काही प्रमाणात जनजागृती झालेली आपल्याला पहायला मिळते.
हल्ली टीव्हीवर सर्रास सॅनिटरी नॅपकीन्सच्या जाहिराती दाखवतात. एखादी अभिनेत्री आपल्याला त्या जाहिरातीत पाहायला मिळते. आमच्याच ब्रॅण्डचे सॅनिटरी नॅपकीन कसे रक्त टिपून घेतात, ऑफिसला जाणाऱ्या बायकांना कसा कमी त्रास होतो, कपडय़ांना लाल डाग कसे लागणार नाहीत अशी हमी त्या जाहिरातींमधून दिली जाते. यातली जाहिरातबाजी, मार्केटिंग बाजूला ठेवलं तर खरं तर या जाहिरातींचे आभारच मानायला हवेत. एखादी मालिका बघताना मधल्या जाहिरातींमध्ये आलेली सॅनिटरी नॅपकीनची जाहिरात अख्खं कुटुंब एकत्र बसून बघतं. हे मुद्दाम होत नसलं तरी ते एकत्र बघितलं जातं हे महत्वाचं आहे. ते कदाचित याबद्दल एकमेकांशी काही बोलतही नसतील, पण एकमेकांसोबत बसून ते बघताहेत हेही नसे थोडकं! नव्याने मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या गोष्टी येऊ पाहत आहेत यामध्ये आता मेन्स्ट्रुअल कप (Menstrual Cups) हे सॅनिटरी नॅपकिनला पर्यायी म्हणून बाजारात उपलब्ध झालं आहे. ते आजून एक स्त्रियांच्या आरोग्याच्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या दृष्टीने कसं उपयुक्त आहे. याची ही माहिती आपल्याला मिळत असते.
भारतीय स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सर अशा समस्या जास्त प्रमाणत आढळतात. कारण आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीने आधी घरातील जबाबदारी पार पडायची मग स्वतःकडे लक्ष द्याचे. अनियमित आहार करणे, व्यायाम,मेडिटेशन न करणं, यामुळे मग मासिक पाळीमध्ये त्याचे परिणाम दिसून येतात. प्रत्येक महिलेने योग्य आणि पौष्टिक आहार केला पाहिजे. शारीरिक स्वच्छेतेबद्दल सांगायचं झालं तर कॉमन टॉयलेट असेल तर ते सॅनेटरी नॅपकिन हे प्रॉपरली वापरलं पाहिजे. अंतर्गत भागांची स्वछता ठेवली पाहिजे. आणि वापरलेले सॅनेटरी पॅड चार ते पाच तासाने बदलले पाहिजे. कारण त्यावेळी एक्सटर्नल इन्फेकशन झालं तर काही काळाने इंटर्नल इंन्फेकशन होऊ शकत. यामुळे सामाजिक, कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना स्वतःच्या आहारावर लक्ष दिल पाहिजे. तरच तुम्ही आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू शकता.
डॉक्टर.अरुण गावडे (स्त्रीरोग तज्ज्ञ)
परंतु, आज आपण पाहतो मासिक पाळीच्या दुखण्यामुळे तिला होणार आणि त्या महिलेला त्या त्रासातून उध्दभवणाऱ्या आजराबद्दल जनजागृती होणं गरजेची आहे. पाळीच्या काळात अस्वछता न राखल्यास युरीन इन्फेकशन, इंफर्टीलिटी, हेपेटायटीस्ट बी,गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर,योनिमार्गाच्या अनेक समस्या उद्धभवू शकतात. यामुळे पाळीच्या काळात शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष दिलॆ पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून जागृती होणं गरजेचं आहे. कोणतीही समस्या असेल तर त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. अनियमित पाळी जर सतत येत असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता योग्य तो उपचार घेतला पाहिजे.आजून एक समाज म्हणा किंवा गैरसमज म्हणा आपल्याला पाहायला मिळतो तो असा की, अनियमित पाळी येत असेल तर सांगितलं जातं की, लग्नानंतर सगळं ठीक होतं.म्हणजे सांगण्याचा अर्थ असा असतो की, लहान झाल्यानंतर शारीरिक संबंध आल्यानंतर त्रास कमी होईल. नियमित पाली चालू होईल. तसंच काही स्त्रियांना पाळीच्या काळात अत्यंत वेदना होत असतात त्या वेदना हि कमी होतील असे समज आणि गैरसमज यामध्येच काही महिला जगत आहेत. यामुळे शालेय पातळीवर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमांतून मुलींमध्ये जनजागृती केली जात आहॆ.
तर यासंबन्धित अनेक स्त्रीरोग तञ सांगतात की,अनियमित पाळी याच्यामागचं खरं कारण दुसरं आहे. लग्नानंतर एखादी स्त्री गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल, पण त्यात नियमितता नसेल,किंवा उलट गोळ्या घेतल्या जात असतील तर मासिक पाळीत निश्चितपणे अनियमितता असते.याचबरोबर लग्नानंतर अनेकींचं वजन वाढतं. तर कधी कधी या वाढलेल्या वजनाशीसुद्धा मासिक पाळीच्या अनियमिततेचा संबंध आहे. पण थेट लग्नाचा म्हणजे शारीरिक संबंधांचा मासिक पाळीच्या नियमिततेशी आणि अनियमिततेशी काहीही संबंध नाही. लग्नानंतर मासिक पाळीत काही बदल होत नसले तर स्त्रीच्या पहिल्या प्रसूतीनंतर तिचं मासिक पाळीच्या वेळचं दुखणं कमी होणं, बंद होणं हे अंशत: बरोबर आहे. ज्या कारणांमुळे पाळीच्या दिवसांमध्ये दुखतं त्यापैकी काही कारणं पहिल्या प्रसूतीनंतर कमी होतात’, असं अनेक स्त्रीरोग तज्ज्ञांचं मतं आहे.
म्हणून मासिक पाळीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं ही काळाची गरज आहे. तिला समजून घेताना तिने स्वतःला जपले पाहिजे. आजून एक समस्या अनेक महिलांमध्ये, मुलींमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे “पीसीओडी” तरुणींमध्ये थायरॉइडचं प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर दिसून येतं. त्यातील थायरॉइड हार्मोन्सचे अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात बनणे मासिक पाळीवर विपरीत परिणाम करते. पाळी येतच नाही, लवकर येते किंवा उशिराने येऊन भरपूर रक्तस्राव होतो. यामुळे लवकरात लवकर तपासणी करून घेऊन उपचार घेतला पाहिजे. मासिक पाळीच्या संपूर्ण यंत्रणेत ओव्हरी (अंडाशय) अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. पीसीओडी, गरोदरपणा, या साऱ्यांच्या दृष्टीने अंडाशय अतिशय महत्त्वाचे आहे. अंडाशय म्हणजे संप्रेरकांची फॅक्टरीच असते आणि संप्रेरकांवर संपूर्ण शरीर, गर्भाशय, गरोदरपणा अवलंबून असतो.
नियमित व्यायाम, योगासन, पौष्टिक आहार, मेडिटेशन करणे यामुळे हि समस्या काही काळानंतर कमी होऊ शकते असाही सल्ला स्त्रीरोग तञ देत असतात. प्रत्येक महिलेने स्वतःला मानसिक, शारीरिक दृष्ट्या मजबूत बनवलं पाहिजे. घर सांभाळणारी प्रत्येक स्त्री आजच्या प्रगतशील भारताचं अनेक पदांवर नेतृत्व करत आहे तर तीच स्त्री स्वतःच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर सुद्धा नक्कीच कमान मिळवू शकते. एक पाऊल तुम्ही टाका एक पाऊल तुमच्यासोबत अनेक महिला टाकतील ‘जागतिक मासिक पाळी स्वछता दिवस’ खऱ्या अर्थाने साजरा केला जाईल हे मात्र खरं आहे.