ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

छगन भुजबळांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल; म्हणाले, “ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी…”

नाशिक | Chaggan Bhujbal – संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आत्तापर्यंत त्यांनी महापुरूषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. यामध्ये आता मंत्री छगन भुजबळ (Chaggan Bhujbal) यांनीही संभाजी भिडेंवर हल्लाबोल केला आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवली जात नाहीत, असं म्हणत भुजबळांनी भिडेंवर निशाणा साधला. ते नाशिकमधील मखमलाबाद शैक्षणिक संकुलात आयोजित ‘समाजदिन सोहळा’ या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, आम्ही कुठेही गेलो तरी शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही. मनोहर कुलकर्णी हे संभाजी भिडेंचं खरं नाव आहे. ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी, संभाजी ही नावं ठेवत नाहीत. आपल्याला जे इतिहास मोडतात त्यांच्याविरोधात उभं राहावं लागेल.

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका आणि सत्तेत सामिल व्हा. तसंच बाबासाहेब सत्तेत सामिल झाले आणि त्यामुळे आपल्याला संविधान मिळालं, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये