ओबीसी बैठकीतील अजित पवारांसोबतच्या वादावर भुजबळांचे स्पष्टीकरण, ”त्यांना चुकीचे मार्गदर्शन…”
मुंबई : (Chhagan Bhujbal On Ajit Pawar) मंत्रालयात झालेल्या ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात एका आकडेवारीवरून खडाजंगी झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यावर आता स्वत: छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी ओबीसी आरक्षणानुसार छगन भुजबळांनी बैठकीत आकडेवारी मांडली. परंतु, ही आकडेवारी चुकीची असल्याचे अजित पवारांना म्हटल्याने दोघांत वाद झाला होता.
वाद नव्हे, थोडी चर्चा झाली
याबाबत स्पष्टीकरण देताना छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार यांच्याबरोबर वाद झाला, हे सत्य नाही.
पण, एससी, एसटी, ओबीसी यांची माहिती तुमच्याकडे असणार असे अजित पवार यांना म्हटले. त्यावरून थोडी चर्चा झाली. मात्र, पराचा कावळा करण्यात आला. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत.
सचिवांनी चुकीचे मार्गदर्शन केले
भुजबळ म्हणाले, दलित, ओबीसी, आदिवासी आणि खुल्या प्रवर्गात कशी आणि किती भरती झाली,
याची टक्केवारी मांडली होती. पण, अजित पवारांना सचिवांनी चुकीचे मार्गदर्शन केल्याने ते बोलले.
एका घरात दोन भावांत चर्चा होत असते. अशी चर्चा आमच्यात झाली. अंतर्गत लढाई वगैरे आमच्यात नाही.