ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील कुणबी प्रमाणपत्र घेणार का?, छगन भुजबळांचा थेट सवाल

इंदापूर : (Chhagan Bhujbal On Harshvardhan Patil) छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा तिसरा मेळावा इंदापूरमध्ये होत आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळांनी कुणबी प्रमाणपत्रावरुन हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर महाराष्ट्रात मराठा उरणार नाहीत, असं भुजबळ म्हणाले.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आपली सभा रात्री १० वाजता बंद होते. त्यांची रात्री १२ ला, २ ला बंद होते. त्यांना परवानगी आहे की नाही, हे माहिती नाही. पोलिस कारवाई करत नाहीत. ते म्हणतील तो कायदा. कायदा फक्त तुम्हाला आणि म्हणाला. ते काहीही बोलले तरी त्यांच्या बातम्या छापून येणार. मी पंधरा दिवसांनंतर बोललं तरी वातावरण बिघडवलं म्हणणार.. आमचं असंच आहे. सौ सोनार की एक लोहार की..

”राज्यात शांतता राहिली तर उद्योगधंदे येतील, हे मान्य आहे. परंतु अशांतता कोण निर्माण करतोय, हे बघितलं पाहिजे. दलित समाज, नाभिक समाजावर मतदानावरुन अन्याय झाला आहे. राज्यात नेमकं चाललंय काय? राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?”

भुजबळ पुढे म्हणाले, जरांगेंच्या उपोषणादरम्यान महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. हे मी दोन महिने बोलत आहे. परंतु कुणीही बोलायला तयार नाही. परंतु विधानसभेत गृहमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं आहे. जमाव हिंसक झाला आणि ७९ पोलिस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी बचावात्मक प्रतिकार केला आणि मग ५० आंदोलक जखमी झाले. ही बाजू उशिराने पुढे आली आहे. नाहीतर त्यांना तेवढी सहानुभूती मिळाली नसती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये