ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…पण तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही”; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

अंबड : (Chhagan Bhujbal On Manoj Jarange) मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी समाज एकवटला आगे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे विचारतात कुणाचं खाताय? अरे तुझं खातोय का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

“हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ म्हणाले, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत.

ओबीसी आरक्षण घटनेनुसार आहे. ओबीसी आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही. ओबीसीत सर्व जाती कायद्याने आल्या. तेव्हा आम्ही विरोध केला नाही. मात्र मराठा समाज अवैधरीत्या ओबीसी समाजात घुसतो आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले, “EWS तून मराठा समाजाला जो लाभ मिळतो. तो लाभ ओबीसींना देखील मिळत नाही. मराठा समाजाला १०-११ कोटी मिळतात मात्र ओबीसी समाजाला हजार कोटी देखील मिळत नाहीत. EWS चा ८५ टक्के मराठा समाज लाभ घेतोय.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये