“…तर आम्ही प्रयत्न करूच”; संजय राऊतांच्या ईडी कोठडीवर छगन भुजबळांची मिश्कील प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. सध्या ते ईडी कोठडीत आहेत. तीन दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या राहत्या घरी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अधिक चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. दरम्यान, ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या कोठडीत आज पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे. ८ ऑगस्ट पर्यंत त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे.
संजय राऊत यांच्या ईडीकोठडीत वाढ झाल्यांनतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांच्या ईडी कोठडीवर मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. ईडी कोठडीत लवकर जमीन मिळत नाही मात्र काही मार्ग सापडलाच तर, आम्ही नक्कीच प्रयत्न करू असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
राऊत यांच्यावरील कारवाईवर शरद पवार साहेब का बोलत नाहीत असा सवाल भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, लोकसभेत राष्ट्रवादीकडून अनेकवेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अनेकवेळा हा कायदा राक्षसी असल्याचं म्हटलं जात आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.