भारत-पाक सीमेवर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण! मुख्यमंत्र्यांचं धडाकेबाज भाषण
जम्मू काश्मीर : काश्मीरमधील (Jammu & Kashmir) कुपवाडा (Kupwara) जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या 41 राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. कार्यक्रमास जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) उपस्थित होते.
त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी आहे. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळाले. विश्वास बसत नाही भारत पाक सीमेवर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे.
पुतळ्याचे वैशिष्ट्य
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशी करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 बाय 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेनं असावं अशापद्धतीनं पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 1800 ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन या बाबी पाहता पक्कं बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.