ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

मुख्यमंत्र्यांनी केलं पंतप्रधानांचं कौतुक; म्हणाले, “संपूर्ण जगभरात…”

पुणे | Eknath Shinde – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक केलं आहे. जगभरातले लोक पंतप्रधान मोदींकडे महत्त्वाचा नेता म्हणून पाहतात ही अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं. आज (1 ऑगस्ट) पंतप्रधान मोदी पुण्यात (Pune) आले असून त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात एकनाथ शिंदेंनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाचं सूत्र पंतप्रधान मोदींनी हाती घेतलं आणि सबका साथ-सबका विकासचा नारा त्यांनी दिला. आज त्यांना प्रधान केलेला पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. संपूर्ण जगभरात मोदींचं नाव आदरानं घेतलं जातं. तसंच जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती मोदींना ग्लोबली पॉवरफुल्ल असं म्हणतात तेव्हा आपली छाती अभिमानाने फुलते, असं म्हणत शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं.

यापूर्वी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा अनेकांना दिला गेला आहे. आजपर्यंत ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलं आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शरद पवारांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर आता संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये