मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार आषाढीची महापूजा, मंदिर प्रशासनाची माहिती

मुंबई | CM Eknath Shinde Will Do Vitthal Rukmini Mahapooja – येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे या आषाढी वारी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांचा मेळा भरलेला आहे. तसंच आषाढी वारीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिमीणीची शासकीय महापुजा होत असते. मात्र यावेळी कोणाच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापुजा होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. पण अखेर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काल (गुरूवार) शपथ घेतली. त्यामुळं आता विठ्ठलची महापुजा नव नियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
काल (गुरूवार) महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड राजभवनात पहायला मिळाली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, दोन वर्षांनंतर आषाढी वारी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालख्या 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे.