ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “मराठा समाजातील लोकांना…”

मुंबई | Eknath Shinde – सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर पत्रकार परिषद घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील एका संवादाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे. याबाबत आता मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पत्रकार परिषदेमध्ये जात असताना फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं आणि इतर काही राजकीय वक्तव्य करायची नाहीत अशी आमची चर्चा सुरू होती. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्हिडीओमध्ये तोडफोड करण्यात आली. या व्हिडीओमधून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असा संदेश पसरवला जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे मराठा समाजानं अशा दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना बळी पडू नये.

मराठा समाजातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला सांगायचं आहे की, दिशाभूल करण्याच्या प्रकाराला कुणीही बळी पडू नका. याबाबतीत सरकार गंभीर आहे. तसंच जे असे प्रयत्न करत आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे की, राज्यात सुव्यवस्था राखायची आहे त्यामुळे असा खोडसाळपणा कोणीही करू नये, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये