फक्त पाच मिनिटांत १०० गणिते अचूक सोडविणारी चिमुकली

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’
पुणे : शिकण्याची इच्छा असेल तर जगातील कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे सिद्ध करून दाखवलं आहे पुण्यातील ईशानी ढोरे हिनेे. ६ वर्षांच्या ईशानी ढोरे हिने ५ मिनिटे आणि ३३ सेकंदात १०० गणिते सोडवून ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये विक्रम नोंदवला आहे. पुण्यातील हडपसर येथील अॅमनोरा पब्लिक स्कूलमधील ती इयत्ता पहिलीमध्ये शिकते. ईशानी ढोरे हिने ५ मिनिटे आणि ३३ सेकंदात १०० गणिते सोडवून ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये विक्रम नोंदवला आहे.
ईशानी ही हडपसर येथील रहिवासी आहे. ईशानीने अबॅकसचे प्रशिक्षण तिची आई श्वेता ढोरे यांच्याकडूनच घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे शाळा, महाविद्यालय बंद होते. आपल्या मुलाचे शिक्षण बुडू नये, यासाठी तिची आई श्वेता ढोरे ईशानीला घरातच शिकवायला लागल्या. काही दिवसांनी जेव्हा ईशानी अबॅकस शिकायला लागली आणि तिचं मन त्यात लागायला लागले. श्वेता ढोरे यांनी तिला विविध गणिते सोडवायला शिकवले. तिने ५ मिनिटे आणि ३३ सेकंदात १०० गणिते सोडवून ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये विक्रम केला असला तरी ती आत्ता १०० गणिते फक्त साडेतीन मिनिटात सोडवते.
एखादा मोठा हिशोब करताना आपल्याला कॅलक्युलेटरची गरज भासते. तेही वेळोवेळी हिशेब बरोबर आहे की नाही त्यासाठी कॅलक्युलेटर चेक करावं लागते. परंतु पुण्यातील ही लीटल कॅलक्युलेटर एकेरी गणिते कितीही मोठी असली तरी ती लगेच त्यांची उत्तरे बरोबर देत आहे. ईशानीच्या या गुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.