“ओ भास्करशेठ तुम्ही आताही नाच्याचं काम…”, चित्रा वाघ यांची मिश्कील टिपण्णी

मुंबई | Chitra Wagh On Bhaskar Jadhav – शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला होता. “पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या मागे संजय राठोड असल्याचं भाजपकडून (BJP) सातत्यानं रान उठवलं गेलं. चित्रा वाघ तेव्हा रोज सकाळी टिव्हीसमोर यायच्या. उद्धव ठाकरे साहेब, आम्ही तुम्हाला चांगलं मानतो. तुमच्याकडून तरी न्यायची अपेक्षा आहे. या मुलीला न्याय द्या, असं म्हणायच्या. आज चित्रा वाघ (Chitra Wagh) कुठे आहेत? आज पूजा चव्हाणच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. कारण चित्रा वाघ यांच्या पक्षाच्या सरकारमध्येच संजय राठोड (Sanjay Rathod) यांना सन्मानानं मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे”, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली होती. यावर आता चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

“ओ, भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका. जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता? तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नव्हे तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा,” असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी भास्कर जाधवांना लगावला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर एसीबीनं (ACB) केलेल्या कारवाईनंतर आज कणकवलीतील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. वैभव नाईक यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय हेतूने झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून त्यांच्या समर्थनार्थ आज कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Sumitra nalawade: