ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…सुप्रिया ताई तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

मुंबई | Chitra Wagh On Supriya Sule – भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीच्या काळात निर्भया पथकातील 99 गाड्या या इतर विभागांना देण्यात आल्या. 12 वाहनं ही त्या वेळच्या मंत्र्यांच्या दिमतीला वापरण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. तसंच निर्भया पथकातील वाहनांचा वापर खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यामध्येही करण्यात आल्याचं सांगत, ताई तुम्ही सुद्ध.. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असा खोचक टोला वाघ यांनी लगावला.

सरकारनं महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकाचा निधी शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी खर्च केल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी केला होता. त्यावर आज (12 डिसेंबर) चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, “निर्भया पथकासाठी मविआच्या काळात 220 वाहनं खरेदी करण्यात आली होती. त्यातील 120 गाड्या या 94 पोलिस स्टेशनसाठी वापरण्यात आल्या. तर 99 वाहनं इतर विभागांना दिले गेले. त्यातील 12 वाहनं ही व्हिव्हिआयपी मंत्र्यांच्या दिमतीला देण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, सुनिल तटकरे, काँग्रेसचे सुनिल तटकरे, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे सुभाष देसाई यांचा समावेश आहे.”

पुढे चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केला आहे. “निर्भया निधी आणि गाड्यांच्या वापरावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर आरोप केला होता. पण मविआच्या काळात सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यात निर्भया पथकाची गाडी वापरण्यात येत होती. ताई तुम्ही सुद्धा..तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, असा गंभीर आरोप वाघ यांनी सुळेंवर केलाय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये