“उद्धव ठाकरे विदूषक”; चित्रा वाघ यांची ठाकरे गटावर जहरी टीका

मुंबई : (Chitra Wagh On Uddhav Thackeray) भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर जहरी टीका केली आहे. राज्यात विदूषकाची टोळी फिरत आहे. उद्धव ठाकरे यांना दुसरं काम उरलं नाही त्यामुळे ते मनोरंजन करतात, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
चित्रा वाघ म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांच्या बालिशपणाची आम्हाला किव येत आहे. दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादात स्वत:च्या सडलेल्या आणि पोकळ बुद्धीचा भोपळा बाहेर फोडण्याचं काम त्यांनी केल. त्यांचे विकृत विचार महाराष्ट्राने ऐकले. न घरका न घाटका, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे विदूषकी वागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,”
“विदूषक केवळ निखळ मनोरंजन करतो. पण उद्धव ठाकरेंना तेही जमत नाही. ते एकटे नाहीत तर सध्या विदूषकांची टोळी राज्यात फिरत आहेत. विदूषकांमध्ये पहिला नंबर सर्वज्ञानी संजय राऊत, दुसरा नंबर भास्कर जाधव आणि तिसरे विदूषक उद्धव ठाकरे आहेत. विदुषकांचा काम असतं लोंकाना हसवन हे तिन्ही विदूषक रोज महाराष्ट्राला हसवायचे काम करतात”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.