पिंपरी चिंचवड

‘आरसी बुक’ मिळवणे नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी 

वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) नागरिकांना त्यांच्या पत्त्यावर आरटीओकडून पाठविले जाते. मात्र, ते  मिळण्यासाठी नागरिकांनी केलेला खटाटोप वाया जात आहे. या वर्षभरात तब्बल १२ हजारांहून अधिक आरसी परत आलेल्या आहेत. अर्जदारांना ते मिळण्यासाठी पोस्ट ऑफिस व आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची वेळ येते. तसेच आरसी बुक मिळविण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे अनेक अर्जदार हे आरसी बुक नेत नसल्याचे दिसून आले आहे.

आरटीओ व पोस्ट ऑफिसचा यांच्या ढिसाळ कारभारामुळे या गोष्टींचा मोठा मनस्तापाला समोरे जावे लागत आहे. २०१२ पासून परिवहन विभागाकडून स्मार्ट कार्ड स्वरूपात आरसी देण्यास सुरुवात झाली. त्याआधी ही आरसी डिलर्सकडेच मिळत असायची. सध्याच्या घडीला आरसी ही स्मार्ट स्वरुपात आल्याने पोस्टामार्फत नागरिकांना त्यांच्या पत्यावर पाठवण्यात येते. तसेच अर्जदाराकडून पोस्टाचे पैसे घेतले जातात. मात्र, त्यांना तशी सेवा मिळत नाही, या सगळ्यावर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- वायसीएम हॅास्पिटलमध्ये ‘रूग्णांची हेळसांड’

परिवहन विभाग व पोस्ट ऑफिस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना आरसी मिळत नाहीत. यामध्ये प्रामुख्याने पत्ता सापडला नाही, घर बंद असणे, मोबाईल क्रमांक चालू नसणे या कारणांसाठी दरवर्षी हजारोंच्या घरात आरसी परत येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे २०२२-२३ या वर्षात तब्ब्ल १३ हजार ८७२ आणि २०२३-२४ या वर्षात त्यामध्ये एक हजारांची कमी होऊन १२ हजार ३८४ आरसी बुक पोस्टातून परत आरटीओत आले आहेत. आरसी परत येण्याचे प्रमाण हे जवळपास दहा ते पंधरा टक्के इतके आहे.

हेही वाचा- पिंपरी चिंचवडमधील १३ अनाधिकृत शाळांची पोलखोल; कडक कारवाईचे आदेश

नागरिकांना मारवे लागताहेत हेलपाटे

जर एखाद्याला वाहन खरेदी करायचे आहे तर त्यांना आरसी बुक तुमच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने येईन असे सांगण्यात येते. मात्र, आरसी बुक जर मिळाले नाही तर ते डिलर्सकडे चौकशी करतात. तेथून त्यांना आरटीओत पाठवले जाते. आरटीओत न मिळाल्यास पोस्टात चौकशी करायला सांगितले जाते, अशाप्रकारे वाहनमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अखेर ते आरसी बुक वाहनधारक घेतच नसल्याचे दिसून येते. जेव्हा वाहन विकायचे असल्यास ते नावावरून घेण्यास आरसी बुकची गरज भासते. तेव्हा मात्र त्यांची तारांबळ उडते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये