पुणेसिटी अपडेट्स

…नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर

जुन्या वाड्याची भिंत कोसळली

पुणे : मुसळधार पावसामुळे कोंढव्यातील जुना रिकामा वाडा पडल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे बाजूच्या घरातील ११ नागरिक मलब्याखाली दबले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरातदेखील मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक सोसायटी, तसेच घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

पुण्यातील कोंढवा बुद्रुक गावठाणातील दत्त मंदिरासमोर आज जुन्या वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडल्याने इतर तीन घरांतील ११ रहिवाशांना अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत कोणीही जखमी व जीवितहानी झालेली नाही. पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेक भागांमध्ये भिंत कोसळणे, झाड पडणे अशा घटना घडत आहेत. पुण्यातीलच सिंहगड रस्ता येथील हिंगणे परिसरातल्या सुदत्त संकुलाजवळ अविनाश विहार सोसायटीजवळ ओढा वाहतो. महापालिकेच्या माध्यमातून या ओढ्याची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, ओढ्याची स्वच्छता केल्यानंतर राडारोडा तेथे बाजूलाच टाकण्यात आला.

यामुळे वरून येणारे पावसाचे पाणी अडवले गेले. त्या पाण्याच्या दाबाने सोसायटीलगत असलेली भिंत पावसाने पडली. नागरिकांनी अथक प्रयत्न करून पाणी जाण्यासाठी रस्ता केला. त्यामुळे पुढील धोका टळला. भिंत पडल्याने सर्व राडारोडा, तसेच दगड सोसायटीच्या आवारात आले आहेत. या ठिकाणची परिस्थिती धोकादायक झाली आहे. अविनाश विहार येथे ए, बी आणि सी अशा तीन विंग आहेत. तिन्ही मिळून येथे सुमारे ३६ सदनिका आहेत. महानगरपालिकेचे कर्मचारी कधी मदतीला येतात, हे पाहू लागेल. हा राडारोडा काढून लवकर या ठिकाणी पाणी काढून द्यावे, हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या पाण्याचा धोका पुन्हा वाढू शकतो, म्हणून लवकरात लवकर महानगरपालिकेने या ठिकाणी काम करावे, अशी इथल्या सोसायटीतल्या नागरिकांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये