ताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडे धरणावरून मोठा राडा; आंदोलक-पोलिसांमध्ये संघर्ष, अजित नवले जखमी

अहमदनगर | Nilwande Dam – अहमदनगरमध्ये निळवंडे धरणावरून (Nilwande Dam) मोठा राडा झाला आहे. आज (14 ऑक्टोबर) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. पण याला धरणाच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांचा विरोध आहे. त्यामुळे धरण परिसरात लोकांनी आक्रमक होत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

निळवंडे धरण परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झाला. यामध्ये किसान सभेचे नेते अजित नवले गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या धरण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आज सकाळी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. पण त्याला धामणगाव आवारी आणि परिसरातील 8 गावांचा विरोध आहे. तसंच निळवंडे पाणी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून उजव्या कालव्याचं काम पूर्ण करून त्यामध्ये पाणी सोडा तसंच तोपर्यंत डाव्या कालव्यातून पाणी सोडू नये, अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये