पिंपरी चिंचवडराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

एएसजीतर्फे स्‍वच्‍छता अभियान

पिंपरी : एएसजी नेत्र रुग्णालय स्वच्छ भारत अभियानांतर्गत एकाच वेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकापासून सुरुवात होऊन कुंजीर चौक, कुणाल आयकॉन रोड, शिवार गार्डन ते पुन्हा कोकणे चौक असा स्वच्छता रॅलीचा मार्ग होता.

रॅलीच्या मार्गावरील कचरा सर्व नागरिकांनी गोळा केला. तसेच स्वच्छतेबाबतची जाणीव करण्याबरोबरच व कचऱ्याचे वर्गीकरण याबद्दल या अभियानाद्वारे माहिती देण्यात आली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये