ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

रवींद्र धंगेकरांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, “एकनाथ शिंदे रात्री 8 वाजेपर्यंत…”

पुणे | Ravindra Dhangekar – कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी उमेदवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर धंगेकर यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. तसंच कसब्यात मतदान झाल्यानंतरही आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. यादरम्यान रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर एकनाथ शिंदे रात्री 8 वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते, असा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी प्रचार संपल्यानंतर उपोषण केलं त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, भाजपचे (BJP) काही लोक रात्री आठ वाजेपर्यंत प्रचार करत होते. त्यामुळे निवडणूक आयोगानं त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. निवडणूक आयोगानं पक्षपातीपणा करु नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं आहे. पण, निवडणूक यंत्रणाही भाजपचं कार्यालय झालं असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, उपोषण करुन आचारसंहितेचा भंग केल्यामुळे रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, यासाठी भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. भाजपच्या शिष्ठमंडळानं निवडणूक कार्यलयात जाऊन तक्रार केली होती. त्यामुळे धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये