देश - विदेश

वाद संपला? रोज भिडणारे शिवसैनिक खेळीमेळीत दिसले, गळ्यात पडून हसले..

नागपूर : (CM Eknath Shinde Meet Sunil Prabhu) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter session) आजचा सहावा दिवस आहे. गेल्या 6 दिवसांपासून विधीमंडळाच्या विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) आणि विधानपरिषद (Maharashtra Vidhan Parishad) या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडताना दिसले.

मात्र आज सर्वपक्षीय आमदाराच्या एकत्र फोटोसेशनवेळी महाराष्ट्राच्या राजकीय प्रगल्भतेचं चित्र पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे हेवेदावे विसरुन, सर्व आमदार खेळीमेळीत पाहायला मिळाले. विधीमंडळ अधिवेशन कामकाजादरम्यान, सर्वपक्षीय फोटोसेशनचे परंपरा आहे. दरवर्षी हे फोटोसेशन होते. आजही विधानसभेच्या सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र फोटोसेशन केले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मध्यभागी तर त्यांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, डाव्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळाले. दरम्यान या फोटोसेशननंतर एकमेकांना भिडणारे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्येही वेगळं चित्र पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू या दोघांमध्ये हास्यविनोद पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसताना दिसले. त्यावेळी बाजूला देवेंद्र फडणवीस, आमदार संतोष बांगर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये