ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

कोळसा घोटाळा प्रकरण; विजय दर्डा, पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाची शिक्षा

नवी दिल्ली | Coal Scam – राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (MP Vijay Darda) आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा (Devendra Darda) यांना मोठा धक्का बसला आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा.लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांनाही तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांच्यासोबतच न्यायालयानं याच प्रकरणात दोन ज्येष्ठ अधिकारी केएस क्रोफा आणि केसी सामरिया, माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना तीन वर्षांची तुरूंगवासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, विजय दर्डा आणि इतरांना न्यायालयानं कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये